click here to download pdf of Gandhi Saptah
सस्नेह निमंत्रण
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह
वर्ष ११ वे
१ ते ७ ऑक्टोबर २०२२
ठिकाण – गांधी भवन, कोथरूड, पुणे ४११०३८.
उद्घाटन हस्ते : मा. सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री)
समारोप हस्ते : मा. संजय आवटे (संपादक, दै. लोकमत)
______________




आवाहन
सप्रेम नमस्कार !
जगात सर्वत्र २ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे कोथरूड येथील गांधी भवनामध्ये १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान गांधी सप्ताह साजरा होतो. यंदाचे हे अकरावे वर्ष!
महात्मा गांधीजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता, हे नव्या पिढीला सांगणे आजही अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने हे सात दिवस गांधी भवन मध्ये विविधांगी कार्यक्रम होत आहेत.
गांधी सप्ताहाचे उद्घाटन यावर्षी शनिवार, दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. सुशीलकुमार शिंदे आणि समारोप मा. संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे. आपले कुटूंबिय व मित्रवर्गासमवेत आपण गांधी सप्ताहात होणा-या प्रबोधन, मनोरंजन आणि माहितीपर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, ही विनंती. दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वा. गांधी भवनात होणा-या सामुदायिक प्रार्थना व भजनाच्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे. तसेच सर्वांनी प्रसादभोजनाचा एकत्रित आनंद घ्यावा, (सकाळी १० ते दुपारी ३) यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण!
पुणे शहर दंगामुक्त असावे, असा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाचा दृढ संकल्प आहे. त्यासाठी दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी पुण्यातील मध्यवस्तीतून ‘शांती मार्च’ निघणार आहे. समाजातील सर्व शांतताप्रेमी लोकांनी या शांती मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मी करीत आहे. समाजात शांती नांदावी, असा आग्रह धरणा-या नागरीकांची संख्या अधिक असेल, तरच समाजात शांतता नांदते, पवित्र कर्तव्य म्हणून आपण या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हावे!
आपला
डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र)
_____________
कार्यक्रमपत्रिका
शनिवार, १ ऑक्टोबर
सायं. ६ वाजता
उद्घाटन समारंभ
हस्ते : मा. सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री)
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. डॉ. कुमार सप्तर्षी
फेसबुक लाईव्ह Link – https://fb.watch/g13ov77y_-/
—————————————
रविवार, २ ऑक्टोबर
सकाळी ८ वाजता
प्रार्थना व भजन
सादरकर्ते – मा. सौ. शुभांगी मुळे व सहकलाकार
—————————————
सकाळी ८.३० वाजता
शांती मार्च
(सुरूवात) लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) – शनिपार – बाजीराव रोड – लक्ष्मी रोड – (समारोप) सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक)
फेसबुक लाईव्ह Link भाग १ – https://fb.watch/g13nDUMGeR/
फेसबुक लाईव्ह Link भाग २ समारोप – https://fb.watch/g13mh1_o8d/
—————————————
सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत : सर्वांसाठी प्रसादभोजन
—————————————
दुपारी ४ वाजता
लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग – जादूगार मा. संजय रघुवीर
—————————————
सोमवार, ३ ऑक्टोबर
सायं. ६ वाजता
संविधानतज्ञ मा. डॉ. उल्हास बापट यांचे व्याख्यान
विषय : संसदीय लोकशाहीची सद्यस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. डॉ. कुमार सप्तर्षी
फेसबुक लाईव्ह Link – https://fb.watch/g13lcPcNJ5/
—————————————
मंगळवार, ४ ऑक्टोबर
सायं. ६ वाजता
ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे किर्तन
फेसबुक लाईव्ह Link – https://fb.watch/g13k5aoLhe/
—————————————
गुरूवार, ६ ऑक्टोबर
सायं. ६ वाजता
पर्यावरणवादी कार्यकर्ते मा. बंडू धोत्रे (चंद्रपुर) यांचे व्याख्यान
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. डॉ. कुमार सप्तर्षी
फेसबुक लाईव्ह Link – https://fb.watch/g13iiCpWwY/
—————————————
शुक्रवार, ७ ऑक्टोबर समारोप समारंभ
सायं. ६ वाजता
प्रमुख पाहुणे
मा. संजय आवटे (संपादक, दैनिक लोकमत)
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. डॉ. कुमार सप्तर्षी
फेसबुक लाईव्ह Link – https://fb.watch/g13fYIpUan/
—————————————
(बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.)
_____________
(खादी, हातमाग व इतर गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री : दि. २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत)
_____________
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
मुख्य कार्यालय
सर्व्हे नं. ३६ , गांधी भवन , कोथरूड, पुणे ४११०३८.
फोन : (०२०) २५३८५०९१
Email : mgsnidhi@gmail.com
Website : www.mgsnidhi.org
_____________